Berari Goat: महाराष्ट्रात उस्मानाबादी (Osmanabadi), संगमनेरी (), बोअर याशिवाय बेरारी जातीच्या शेळ्यांचे संगोपन केले जाते आणि यातील बेरारी शेळी अमरावती विभागात मोठ्या प्रमाणात अढळत असते. सध्याचा अमरावती विभाग हा बेरार प्रांत म्हणून ओळखला जात असे आणि म्हणूनच या प्रांतात आढळणाऱ्या शेळ्यांना बेरारी असे संबोधले जाते आणि बेरारी शेळीचा (Berari Goat) विस्तार विदर्भातील ११ जिल्ह्यांत आहे. नागपूर, वर्धा, अमरावती व अकोला जिल्ह्यांत जास्त प्रमाणात या शेळ्यांची संख्या आहे.
- बेरारी शेळीला स्थानिक भागात लाखी किंवा गावरानी या नावाने सुद्धा ओळखले जात आहे.
- महाराष्ट्रातील उस्मानाबादी व संगमनेरी या शेळ्यांच्या जाती सोबतच विदर्भातील बेरारी या स्थानिक शेळीची राष्ट्रीय स्तरावर अधिकृत जात म्हणून याची नोंद करण्यात आली आहे.
- राज्यातील स्थानिक शेळ्यांच्या जातींनी तेथील वातावरणात योग्य प्रकारे जुळून घेतले गेले आहे.
- त्यांची रोगप्रतिकारक शक्ती तसेच उष्ण वातावरणात टिकून राहण्याची क्षमता चांगली आहे, त्यामुळे उपलब्ध परिस्थितीत अधिक उत्पन्न मिळवून देतात आणि बेरारी शेळी विषयी स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेतील डॉ. शैलेंद्र कुरळकर यांनी दिलेली माहिती पाहुया.
- बेरारी शेळी मध्यम आकाराची असून प्रामुख्याने मांसासाठी पाळली जाते आणि पूर्ण वाढ झालेल्या बेरारी बोकडाचे सरासरी वजन ३६ किलो तर शेळीचे वजन ३० किलोपर्यंत असते.
- जन्मतः नर करडाचे वजन २.४६ किलो तर मादी करडाचे वजन २.३६ किलो असते. करडांचे ३ महिने वाढीपर्यंतचे वजन अनुक्रमे ९.२२, ८.७० किलो व ६ महिन्यांपर्यंत १५.४१ व १४.६५ किलो आहे.
- एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे सरासरी वजन २३ किलो, तर मादीचे सरासरी वजन २० किलो असते आणि या शेळीमध्ये एका वेतात करडू देण्याचा विचार केला असता एक करडू देण्याचे प्रमाण ४१.५६ टक्के, जुळे देण्याचे प्रमाण ५६.४५ टक्के, तिळे देण्याचे प्रमाण १.८७ टक्के, तर चार पिले देण्याचे प्रमाण ०.१२ टक्का असते.Berari Goat
प्रजनन क्षमता
शेळीचे प्रथम वयात येण्याचे वय २९२ दिवस, प्रथम गर्भधारणेचे वय ३१३ दिवस आणि प्रथम विण्याचे वय ४६० दिवस असते आणि शेळीच्या दोन वेतांतील अंतर २४० दिवस, तर व्यायल्यानंतर पुन्हा गाभण राहण्याचा काळ ९१ दिवस असतो.Berari Goat
शेळीचा गाभण काळ १४७ दिवस व माजाच्या चक्राचा कालावधी हा २१ दिवसांचा असतो तसेच प्रजनन क्षमतेचा विचार केला असता बेरारी शेळी लवकर वयात येते. दोन वर्षांत तीन वेळा वित असते.
उत्पादन क्षमता
शेळीची प्रति दिन सरासरी दूध उत्पादन क्षमता ५३३ ग्रॅम, तर एका वेतातील दूध उत्पादन ७८ किलो असते आणि या जातीच्या शेळीचा दूध उत्पादनाचा काळ १३३ दिवस व भाकड काळ ११० दिवसाचा असतो.
शेळीच्या दुधातील स्निग्धांचे प्रमाण ५.७२ टक्के, तर दुधातील स्निग्ध विरहित घन प्रमाण ११.१५ टक्के असते.